Posts

माझ्या आईची गोष्ट

Image
  दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत कौतुकास्पद पायंडा पाडला. त्यांनी कोणतंही थाटामाटात सेलिब्रेशन न करता महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीतील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांच्या त्यागाची ओळख करुन देण्यासाठी पुस्तक निर्मितीची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेतून अनेक लढाऊ कार्यकर्त्यांचं धगधगतं प्रेरणादायी आयुष्य पुस्तकांच्या माध्यमातून समोर आलं. कॉम्रेड पानसरेंनी असा प्रयोग केला नसता , तर कदाचित अनेक कार्यकर्त्यांवर फार लिहिलंही गेलं नसतं. ‘ माझ्या आईची गोष्ट ’ ही त्याच संकल्पनेचा एक भाग. सिंधुदुर्गात मायनिंग आणि शेतकऱ्यांची जमीन बळकावणाऱ्या प्रकल्पांविरोधात जनआंदोलन उभारणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या वैद्यही पाटकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ माझ्या आईची गोष्ट ’ हे पुस्तक आहे. एक सर्वसामान्य गृहिणी ते बेडर लढाऊ कार्यकर्ती असा प्रवास यातून त्यांच्याच मुलाने म्हणजे डॉ. रुपेश पाटकर यांनी मांडला आहे. खरंतर हे पुस्तक काही चरित्र किंवा आत्मचरित्र नाही. हे पुस्तक म्हणजे प्रेरणादायी संघर्षांचा कोलाज आहे. धगधगत्या घटनांची नोंद आहे. अवघ्या सात ते आठ वर...

ट्रोलिंगचा पर्दाफाश

Image
तशी अनेक कारण आहेत. पण त्यातली तीन अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत , ज्यांमुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं वाटलं. एक म्हणजे जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही प्रणालीचा हा देश. या देशाने अनेक सरकारं पाहिली. हुकूमशाहीकडे वळू पाहणाऱ्या सरकारांचे डोके ठिकाणावर आणले. केलेल्या कामाच्या जोरावरच इथली जनता मतं देत आली आहे. काही भावनिक मुद्द्यांच्या निवडणुकाही झाल्या. नाही असे नाही. मात्र आता आता आलेल्या या सोशल मीडिया नावाच्या गोष्टीने एक पक्ष राक्षसी बहुमत मिळवत सत्तेत येऊ शकतो ? अजूनही बाल्यावस्थेत असणाऱ्या एका गोष्टीत इतकं काय सामर्थ्य आहे किंवा या गोष्टीचा एखाद्या पक्षाने इतका काय आणि कसा कसा वापर केला ?, याचं कुतुहल प्रचंड होतं.  हे पुस्तक वाचण्याचं दुसरं कारण म्हणजे , ट्रोलसंदर्भातील वाढत्या चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेलं हे पुस्तक. सात-आठ वर्षे सोशल मीडियावर आहे. त्यातील गेली तीन-एक वर्षे तर सातत्याने रोज किंवा एक दिवसाआड काही ना काही लिहितोच आहे. मात्र सत्ताधारी वर्गाविरोधात काहीही लिहिलं की , जथ्थेच्या जथ्थे कमेंटचा पाऊस पाडतात. झुंडीने येऊन आपल्याला हैराण करतात , हे पाहिल...

द ग्रेट रिप्रेशन

Image
देशद्रोह शब्द एकेकाळी वजनदार होता. या विधानामागची सकारात्मक-नकारात्मक बाजू सोडा. पण या शब्दाला वजन होतं, हे कुणीही नाकारू शकत नाही. देशद्रोहाचा खटला म्हटल्यावर त्या माणसाबद्दल भले हजार मतमतांतरे असतील, पण त्याच्याकडे कुतूहलानं पाहिलं जाई. त्याच्याबद्दल ऐकलं जाई. आज काय स्थिती आहे? आज खिरापतीसारखं देशद्रोही ठरवलं जातं. वेळप्रसंगी कायद्याच्या पातळीवरही नेऊन ठेवलं (किंवा अडकवलं?) जातं. म्हणूनच या शब्दाचा इतिहास आणि त्याला चिकटलेल्या कायद्याबद्दल काहीसं कुतूहल मला निर्माण झालं होतं. आणि तुम्हाला सांगतो, कुतूहल नावाची तहान सहजा सहजी भागत नाही. आणि ती न भागणं आपल्या बौद्धिक वृद्धीसाठी चांगलंच असतं. असं कुणी म्हटलं नाही, मीच आपलं म्हणतोय. तर याच कुतूहलापोटी हे पुस्तक मिळवलं, ज्याचं नाव आहे - 'The Great Repression'. भारतीय दंड संहितेतील '124-A' या कलमाचा घेतलेला उभा-आडवा आढावा म्हणजे हे पुस्तक. 1857 च्या उठावानंतर ब्रिटीश सरकारला कळलं की, हे काहीतरी भलतंच होतंय. आपण यांना आवरलं पाहिजे. हे नियंत्रणाबाहेर गेले तर इथं आपला सूर्य उगवण्याआधीच मावळेल. अगदी असंच त्यांच्या मनात आलं नसल...